प्रीतम मुंडेंचा भाजपाला घरचा आहेर; त्या खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही, ही खेदाची बाब
Admin

प्रीतम मुंडेंचा भाजपाला घरचा आहेर; त्या खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी गेले नाही, ही खेदाची बाब

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरु केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरु केलं आहे. कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रीतम मुंडेंनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. प्रीतम मुंडे म्हणाल्या की, केवळ खासदारच नाही तर एक महिला म्हणूनही मला त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. असे आरोप जेव्हा होतात, तेव्हा त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती.

तसेच त्या म्हणाल्या की, या प्रकरणात योग्य ती कारवाई व्हायला हवी. सरकारकडून त्या महिला खेळाडूंशी संवाद साधायला कोणीच गेलं नाही. ते व्हायला हवं होतं.त्याची वेळेवर चौकशी व्हायला हवी होती, यातील सत्य समोर यायला हवं होतं. असे प्रीतम मुंडे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com