राष्ट्रवादी काँग्रेस किती दिवस काँग्रेससोबत राहिल माहित नाही, असे पृथ्वीराज चव्हाण का म्हणाले?
Admin

राष्ट्रवादी काँग्रेस किती दिवस काँग्रेससोबत राहिल माहित नाही, असे पृथ्वीराज चव्हाण का म्हणाले?

कर्नाटकातील निपाणी मतदारसंघात प्रचारादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं आहे.

कर्नाटकातील निपाणी मतदारसंघात प्रचारादरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

यावेळी त्यांनी वक्तव्य केलं की, कोण नेता जाणार, कोण थांबणार. त्यांनी काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी ठरवावं. पण काय झालंय राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा रद्द झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने इथे आपला उमेदवार उभा केलाय असं मी ऐकलंय. राष्ट्रवादी काँग्रेस किती दिवस काँग्रेससोबत राहिल हे माहित नाही. कारण भाजपासोबत त्यांची रोज बोलणी सुरु आहे. असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com