पुणे-सोलापूर हायवेवर खासगी बसचा अपघात;  बसमधील 11 प्रवासी गंभीर जखमी
Admin

पुणे-सोलापूर हायवेवर खासगी बसचा अपघात; बसमधील 11 प्रवासी गंभीर जखमी

पुणे शहराकडे भरधाव वेगाने येणाऱ्या खाजगी बसचा अपघात झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विनोद गायकवाड, दौंड

पुणे शहराकडे भरधाव वेगाने येणाऱ्या खाजगी बसचा अपघात झाला आहे. देवदर्शनावरुन निघालेल्या बसचा भीषण अपघात झाला आहे. बसमध्ये 50 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बसमधील 11 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते खासगी बसने तुळजापूर, येरमाळा येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com