Jalgaon Accident
Jalgaon Accident

Jalgaon Accident : पाळधी गावानजीक अहमदाबाद कडे जाणाऱ्या खाजगी बसचा अपघात

जळगावात खासगी बस उलटून भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात आतापर्यंत 25 ते 30 जण जखमी झाले असून सध्या बचावकार्य सुरु आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून मदतकार्य....
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

जळगाव - मंगेश जोशी : जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल सुगोकीजवळ रविवारी रात्रीच्या सुमारास खाजगी प्रवासी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला असून या अपघातात 25 ते 30 प्रवासी जखमी झालेत. तर 4 प्रवासी गंभीर असल्याची माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे

बस क्रमांक जी.जे.8.बी.व्ही.3042 ही अकोल्याहून अहमदाबाद कडे जात असताना पाळधी गावानजीक हॉटेल सुकीजवळ ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटून पलटी होऊन हा अपघात झाला असून या बस मध्ये 55 प्रवासी हे प्रवास करत होते. दरम्यान अपघाताची माहिती मिळतात पाळधी गावातील ग्रामस्थांनी तात्काळ बसच्या काचा फोडून प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यास मदत केली. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव कडून पाळधी कडे जात असताना अपघाताची माहिती मिळताच तात्काळ गुलाबराव पाटलांनी घटनास्थळी दाखल होऊन स्वतः आपल्या कार्यकर्त्यांसमवेत मदत कार्य करत रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमी प्रवाशांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये अमिना इस्माईल (वय-3), सलीम जुनेद (32), आबेदा सलीम (25), अन्वर मिया (13), सुलतान बाबाजी भाई (40), निकत बाबजी भाई (24), गिरिषभाई प्रजापती (28), योगिता सनसे (23), परमेश्वर वाळूके (27), शुभम कोल्हे (24), अमिनाबी अली (54), कविता लालजी भाई (39), रोनक लालजी भाई (16), मनोजकुमार (22), प्रज्ञा मिलन पटेल (23), प्रतीक बोदडे (24), दर्शन बोदडे (14), मनू मोहमद (22), ज्ञानेश्वर सोनवणे (02). शाम मुंढे (22), शुभम देशमुख (27), रियाज पटेल (04), रितिका पटेल (42) यांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com