ताज्या बातम्या
Balrangbhumi : शासनाच्या बालनाट्य स्पर्धेमध्ये 'खासगी हस्तक्षेप'?; नेमकं प्रकरण काय?
खासगी संस्थेकडून शासनच्या स्पर्धेवर कब्जा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान सर्वावर राजकीय दबाब असल्याचे आरोप केला जात आहे. tive
थोडक्यात
बालनाट्य स्पर्धा आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धाचे आयोजन
हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता
खासगी संस्थेकडून शासनच्या स्पर्धेवर कब्जा करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून बालनाट्य स्पर्धा आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धाचे आयोजन होते. मात्र हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. खासगी संस्थेकडून शासनच्या स्पर्धेवर कब्जा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान सर्वावर राजकीय दबाब असल्याचे आरोप केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तसे गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.
