प्रियंका गांधी पुन्हा कोरोना पॉझिटीव्ह; दोन महिन्यांत दुसऱ्यांदा संक्रमित

प्रियंका गांधी पुन्हा कोरोना पॉझिटीव्ह; दोन महिन्यांत दुसऱ्यांदा संक्रमित

कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची चाचणी दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटीव्ह आली आहे. ट्विटवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची चाचणी दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटीव्ह आली आहे. ट्विटवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे. केवळ दोन महिन्यातच प्रियंका गांधी यांची कोरोना पुन्हा कोरोना पॉझिटीव्ह झाल्या आहेत.

प्रियंका गांधी यांनी म्हंटले की, कोरोना चाचणीचा अहवाल पुन्हा पॉझिटीव्ह आला आहे. मी होम आयसोलेशनमध्ये असून सर्व प्रोटोकॉल पाळत आहे. संपर्कात आलेल्या लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी ट्विटरद्वारे केले आहे.

प्रियंका गांधी यांना दोन महिन्यांत दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी ३ जून रोजी त्या कोरोना पॉझिटीव्ह आल्या होत्या. त्याआधी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता.

दरम्यान, महागाई आणि जीएसटीविरोधात काँग्रेसने नुकतेच देशभरात निदर्शने केली होती. यावेळी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस खासदारांनी संसदेतून मोर्चा काढला होता. तर, काँग्रेस कार्यालयापासून प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रियांका गांधींनी रस्त्यावरच धरणे आंदोलनास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com