Pro Govinda 2025 : 'प्रो गोविंदा सीझन 3' च्या पूर्व पात्रता फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद; 16 संघ अंतिम फेरीत दाखल

Pro Govinda 2025 : 'प्रो गोविंदा सीझन 3' च्या पूर्व पात्रता फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद; 16 संघ अंतिम फेरीत दाखल

प्रो गोविंदा सीझन 3 च्या पूर्व पात्रता फेरीत राज्यभरातील गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
Published by :
Rashmi Mane
Published on

ठाण्यातील स्व. बाबूराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटर येथे झालेल्या प्रो गोविंदा सीझन 3 च्या पूर्व पात्रता फेरीत राज्यभरातील गोविंदा पथकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. एकूण 32 संघांनी आपल्या दमदार खेळकौशल्याचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीग अध्यक्ष पुर्वेश सरनाईक, मुंबई टी 20 लीगचे अध्यक्ष विहंग सरनाईक, नगरसेविका परिषा सरनाईक, डॉ. कश्मिरा सरनाईक आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.

आपल्या मातीतल्या खेळाला प्रो गोविंदाच्या माध्यमातून व्यावसायिक आणि जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले. आपल्यातील अंगभूत कौशल्य आणि अचूक टायमिंग साधून या स्पर्धेत स्वतःची जागा मिळवणाऱ्या सर्वच गोविंदांचे मनापासून कौतुक आहे. गोविंदा या उत्सवाला प्रो गोविंदाद्वारे खेळाचा दर्जा प्राप्त झाला. याचा अत्यंत अभिमान आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

या पात्रता फेरीत मानवी मनोऱ्यांचे शौर्यपूर्ण सादरीकरण पाहायला मिळाले. गोविंदा या पारंपरिक खेळाला व्यावसायिक दर्जा मिळावा आणि जागतिक स्तरावर मान्यता मिळावी, हाच या स्पर्धेचा उद्देश असल्याचे प्रो गोविंदा लीग अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी सांगितले. हा प्रो गोविंदा सीझन 3 यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व परीक्षकांचे आणि संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार त्यांनी व्यक्त केले.

येत्या 7, 8, 9 ऑगस्ट 2025 ला एस. व्ही. पी. स्टेटियम, डोम, वरळी येथे अंतिम फेरीत निवड झालेल्या १६ संघांचे अजून अधिक दर्जेदार आणि थरारक सादरीकरण पाहता येणार आहे. दहीहंडी हा केवळ उत्सव नाही, तर कबड्डी आणि क्रिकेटप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. या माध्यमातून गोविंदा पथकांना आर्थिक संधी, सुरक्षितता, तसेच मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची दाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून प्रो गोविंदा लीगद्वारे गोविंदा खेळाला आधुनिक, व्यावसायिक आणि आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचे पाऊल यशस्वीपणे उचलले जात आहे.

अंतिम फेरीत पात्र ठरलेले संघ -

1. आर्यन्स गोविंदा पथक

2. यश गोविंदा पथक

3. शिवसाई क्रीडा मंडळ

4. शिवगणेश मित्र मंडळ

5. अष्टविनायक गोविंदा पथक

6. ओम ब्रह्मांड साई गोविंदा पथक

7. अखिल मालपा डोंगरी 1, 2, 3 मित्र मंडळ गोविंदा पथक

8. श्रीराम गोविंदा पथक

9. हिंदुराज गोविंदा पथक, दापोली

10. संतनगर गोविंदा पथक

11. शिवनेरी गोविंदा पथक

12. शानदार गोविंदा पथक

13. शिवटेकडी गोविंदा पथक

14. विघ्नहर्ता गोविंदा पथक

15. बाल उत्साही गोविंदा पथक

16. संभाजी क्रीडा मंडळ

हेही वाचा

Pro Govinda 2025 : 'प्रो गोविंदा सीझन 3' च्या पूर्व पात्रता फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद; 16 संघ अंतिम फेरीत दाखल
Devendra Fadnavis : 'ठाकरे मुख्यमंत्री असतानाच समितीचा जीआर निघाला', मुख्यमंत्र्यांनी दाखवली उद्धव ठाकरेंची सही
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com