Lalbaugcha Raja 2025 : निर्माता दिग्दर्शक अभिनेता आदिनाथ कोठारे लालबागच्या राजाच्या चरणी !
Actor-producer-director Adinath Kothare recently visited Lalbaghcha Raja : बाप्पा विराजमान झाले आणि सगळं वातावरण एकदम छान असताना अभिनेता निर्माता दिग्दर्शक आदिनाथ कोठारे याने नुकतंच लालबागच्या राजाच दर्शन घेतलं. आदिनाथ ने सोशल मीडिया वर एक खास व्हिडिओ शेयर करून लालबागच्या राजाच्या दरबारातली खास झलक प्रेक्षकांना दिली आहे.
आदिनाथ कॅप्शन देऊन म्हणतो " कालच्या नशीबवान दर्शनाची झलक " व्हिडिओ मध्ये आदिनाथ तल्लीन होऊन बाप्पाच्या दर्शनात दंग झालेला दिसतोय. कामाच्या दृष्टीने तो सध्या स्वतःला खूप " नशीबवान " समजतो आहे कारण लवकरच आदिनाथ नव्या कोऱ्या मालिकेत मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. नशीबवान मालिकेची निर्मिती करून स्वतःच्या मालिकेत अभिनेता म्हणून देखील तो काम करणार आहे म्हणून ही मालिका त्याचासाठी खास असल्याचं कळतंय.
आदिनाथ बॉलिवूड मध्ये देखील बड्या प्रोजेक्ट्स मध्ये दिग्गज कलाकारांच्या सोबतीने काम करताना दिसणार आहे. गांधी, रामायण आणि अनेक उत्कंठावर्धक बॉलिवुड प्रोजेक्ट्स मध्ये तो काम करणार असून ही भावना त्याचासाठी " नशीबवान" आहे यात शंका नाही !