Deenanath Mangeshkar Hospital : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात आंदोलनास बंदी; 100 मीटर परिसरात निर्बंध
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेच्या उपचारासाठी दहा लाखांची मागणी केली. महिलेचे कुटुंब हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असून देखील महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही. शेवटी त्या महिलेला इतर रुग्णालयात हलवत असताना त्या महिलेला त्रास झाला. जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाला.
या प्रकाराने संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच रुग्णालयाचा बाहेर आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या 100 मीटर परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत.
रुग्णालय परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांशिवाय इतरांना एकत्र जमण्यास प्रतिबंध करण्यात आले असून दीनानाथ मंगेशकर रुग्णालय एक दोन किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. रुग्णालय परिसरात कोणत्याही आंदोलनाला परवानगी नाही. पुढील दहा दिवसांसाठी हे निर्बंध असणार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी आदेश काढले आहेत.