Pune Crime News BJP : भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलिसाचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद

पुणे क्राइम: भाजप पदाधिकाऱ्यांकडून महिला पोलिसाचा विनयभंग, सीसीटीव्हीत कैद
Published by :
Riddhi Vanne

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्या होता. भाजपचे नेते शनिवार वाड्याजवळ जमले होते. त्यावेळी भाजपचे कसबा पेठचे आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांना आणि बंदोबबस्तासाठी असलेल्या पोलीसांना एका दुकानात चहा पिण्यासाठी घेऊन गेले. त्यावेळी गर्दीचा फायदा घेत महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नको त्याठिकाणी हात लावत, भाजपाचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे उर्फ पम्याने महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने तक्रार केली. पम्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. आता त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com