Pune Crime : असला कसला बाप ? बायकोने चिकन न दिल्याने पतीने मुलीच्या डोक्यात घातली वीट

Pune Crime : असला कसला बाप ? बायकोने चिकन न दिल्याने पतीने मुलीच्या डोक्यात घातली वीट

पुण्यातील पाषाण परिसरातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीने जेवणात चिकन न दिल्याने पतीने रागाच्या भरात घराशेजारी खेळत असलेल्या लहान मुलीच्या डोक्यात वीट मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Published by :
shweta walge

पुण्यातील पाषाण परिसरातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीने जेवणात चिकन न दिल्याने पतीने रागाच्या भरात घराशेजारी खेळत असलेल्या लहान मुलीच्या डोक्यात वीट मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. या घटनेत लहान गंभीर जखमी झाली आहे. नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

विकास नागनाथ राठोड असे आरोपीचे नाव असून तो वाकेश्वर रोड येथे पत्नी आणि मुलीसह राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास राठोड याने सोमवारी रात्री पत्नीकडे जेवण मागितले. पत्नीने जेवाणात चिकन न दिल्याने विकासला प्रचंड राग आला. त्याच रागाच्या भरात त्याने काहीही विचार न करता तिथेच पडलेली एक वीट उचलली आणि त्याच्या लहान मुलीच्या डोक्यात मारली. यामध्ये ती चिमुकली गंभीर जखमी झाली. याप्रकरणी आरोपी विकासचे सासरे रघुनाथ लालु पवार (रा. पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत जावयाविरुद्ध तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com