ताज्या बातम्या
Video : दरवाजावर सपासप वार, 7 सेकंदांचा थरार; पुण्यात कोयता गँगची दहशत
पुण्याच्या येरवडा भागात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळते आहे.
पुण्यात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्याच्या येरवडा भागात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळते आहे. येरवड्यातील काही भागात अनेक घरांवर कोयत्याने दार वाजवून दहशत निर्माण करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या भागात स्थानिकांच्या दारावर कोयत्याने सपासप वार करुन आरोपी फरार झाले आहेत. या घटनेने स्थानिकांमध्ये भितीचं वातावरण पसरले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून या व्हिडिओमध्ये 7 सेकंदांचा थरार पाहायला मिळत असून पोलीस या आरोपींची शोध घेत आहेत.