पुणे विभाग मतमोजणीसाठी सज्ज; मतमोजणी कक्षातील सर्व कामकाजाचे सीसीटीव्हीद्वारे रेकॉर्डिंग होणार

पुणे विभाग मतमोजणीसाठी सज्ज; मतमोजणी कक्षातील सर्व कामकाजाचे सीसीटीव्हीद्वारे रेकॉर्डिंग होणार

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी पुणे विभाग सज्ज झालं आहे. मतमोजणी कक्षातील सर्व कामकाजाचे सीसीटीव्हीद्वारे रेकॉर्डिंग होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळी साडे आठ वाजता EVM मतमोजणीची सुरूवात होणार असून मतमोजणीसाठी 2 हजार 70कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

बारामती, पुणे मतदारसंघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात होणार आहे. तसेच मतमोजणी केंद्रात मोबाईल आणण्यास मनाई करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com