Pune Fire : पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल नऊ गॅस टाक्यांचा स्फोट, 3 स्कूल बस जळाल्या

Pune Fire : पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल नऊ गॅस टाक्यांचा स्फोट, 3 स्कूल बस जळाल्या

पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी नऊ गॅस टाक्यांचा स्फोट झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Published by :
Team Lokshahi

पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी नऊ गॅस टाक्यांचा स्फोट झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पिंपरी चिंचवडमधील ताथवडे शहरात एका टँकरमधून गॅस चोरी करताना तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट झाला. एकामागोमाग एक स्फोट झाल्यानं ताथवडे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. आगीचे रौद्ररूप पाहून गॅस चोरीचा काळाबाजार करणाऱ्यांनी इथून पळ काढला. ज्या ठिकाणी आग लागली, त्याच्या बाजूलाच शाळा, हॉस्टेल आणि रहिवाशीही राहत होते. दरम्यान यात सुदैवाची गोष्ट म्हणजे या आगीच्या कचाट्यात कोणीच सापडले नाही, मात्र शाळेतील तीन वाहनं यात जळून खाक झाली आहेत.

पिंपरी चिंचवडमधील ताथवडे शहरात एका टँकरमधून गॅस चोरी करताना तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट झाला. एकामागोमाग एक स्फोट झाल्यानं ताथवडे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. आगीचे रौद्ररूप पाहून गॅस चोरीचा काळाबाजार करणाऱ्यांनी इथून पळ काढला. ज्या ठिकाणी आग लागली, त्याच्या बाजूलाच शाळा, हॉस्टेल आणि रहिवाशीही राहत होते. दरम्यान यात सुदैवाची गोष्ट म्हणजे या आगीच्या कचाट्यात कोणीच सापडले नाही, मात्र शाळेतील तीन वाहनं यात जळून खाक झाली आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com