शिरूरच्या डॉ. मानसी साकोरे यांनी यूपीएससी परीक्षेत सलग तिसऱ्यांदा यश मिळवून रचला इतिहास
शिरूर तालुक्यातील डॉ. मानसी नानाभाऊ साकोरे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सलग तिसऱ्यांदा यश मिळवत इतिहास रचला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण शिरूर तालुक्यात आनंदाची लाट उसळली आहे. त्यांनी देशात ४५४ वा क्रमांक मिळवत त्यांनी शिरूर तालुक्याच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे.
डॉ. मानसी यांचे प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण शिरूर येथील विद्याधाम प्रशालेत झाले. यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली आणि 2023मध्ये 563 वी, 2024 मध्ये 531वी आणि 2025 मध्ये 454 वी रँक मिळवत सलग तिसऱ्यांदा यश मिळवले.
या यशाबद्दल बोलताना डॉ. साकोरे म्हणाल्या की, “माझ्या यशामागे कुटुंबाचे पाठबळ, जिद्द आणि अपयशातून शिकण्याची तयारी कारणीभूत ठरली. सातत्याने मेहनत केली,तरुणांनी पर्यायी योजना तयार ठेवावी, आणि मी कधीही हार मानली नाही.”