एमपीएससी विद्यार्थ्यांचं आज पुण्यात आंदोलन

एमपीएससी विद्यार्थ्यांचं आज पुण्यात आंदोलन

एमपीएससी विद्यार्थ्यांचं आज पुण्यात आंदोलन
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून परिक्षेचा नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करण्यात यावा या मागणीसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आज सकाळी 10 वाजता पुण्यातील अलका चौकात साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात येणार आहे. एमपीएससीचे विद्यार्थी आयोगाने त्यांचे म्हणणे ऐकावे यासाठी अलका चौकात दंडवत घालणार आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यावर्षीपासून म्हणजे 2023 पासून यूपीएससीच्या धर्तीवर नवीन पॅटर्ननुसार परिक्षा घेण्याच ठरवण्यात आलं आहे, ज्याला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. काही दिवसांपूर्वी याच मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून पुण्यातील अलका चौकातच जोरदार आंदोलन करण्यात आले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com