Pune-Mumbai Express Way : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 'या' वेळेत आज मेगाब्लॉक

Pune-Mumbai Express Way : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 'या' वेळेत आज मेगाब्लॉक

पुणे-मुंबई द्रुतगतीवर दरड कोसळू नये, म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे-मुंबई द्रुतगतीवर दरड कोसळू नये, म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. पुन्हा नव्यानं जाळ्या लावल्या जातायेत. याच पार्श्वभूमीवर पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज ही मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरूच राहील.दुपारी 2 ते 4 दरम्यान मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक किवळेपासून वळवली जाणार आहे. जुन्या पुणे मुंबई महामार्गाने ही वाहतूक जाणार आहे. दोन तासांच्या या ब्लॉकमध्ये पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळची सैल झालेली दरड हटवली जाणार आहे.

काल रात्री पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मातीचा ढिगारा कोसळला होता. पावणे नऊ वाजता घडलेल्या घटनेनंतर एका लेनवरून वाहतूक सुरू होती. काहीवेळात मातीचा हा ढिगारा बाजूला केल्यावर उर्वरित दोन लेनही सुरू केल्या

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com