Pune Mundhwa land Scam : पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणाला नवे वळण; शीतल तेजवानीने 275 जणांकडून जमीन घेतल्याचे उघड
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात नवे तपशील समोर आले आहेत. शीतल तेजवानी यांनी तब्बल २७५ जणांकडून जमिनीचे पॉवर ऑफ अटर्नी घेतल्याचे उघड झाले आहे. या सर्व व्यक्तींना पोलिसांनी चौकशीची नोटीस दिली असून काही जण सोमवारी हजरही झाले, मात्र त्यांनी आपले जबाब नंतर देऊ अशी भूमिका घेतली.
आर्थिक गुन्हे शाखा या व्यवहाराची चौकशी करत आहे. मुंढवा येथील सरकारी जमिनांच्या खरेदी-विक्रीदरम्यान अमेडिया एंटरप्रायझेस या कंपनीने मुद्रांक शुल्क टाळल्याचा आरोप आहे. या कंपनीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागीदारी असल्याचीही माहिती समोर आली आहे.
बावधन येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या दस्तऐवजावर शीतल तेजवानी आणि कंपनीचे भागीदार दिग्विजयसिंह पाटीलांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्रकरणात तेजवानी, पाटील तसेच दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
थोडक्यात
पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणात मोठी अपडेट...
शीतल तेजवानीने 275 जणांकडून जमीन घेतल्याचे उघड.....
275 पैकी 10 जणांची पोलिसांकडून चौकशी....
शीतल तेजवानीने 275 जणांकडून जमीन घेतल्याचे उघड

