Pune Accident : पुणे नवले पुल दुर्घटना; मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांना 'इतक्या' लाखांची मदत जाहीर
पुणे शहरात गुरुवारी उशिरा रात्री नवले पुलाजवळ भीषण अपघात झाला असून, 8 जणांचा मृत्यू आणि 20 जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर अनेक वाहनांना आग लागल्याने घटनास्थळी भीषण दृश्य निर्माण झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन कंटेनर आणि काही कार एकमेकांवर आदळल्या, त्यानंतर एका कारने पेट घेतला. त्या कारमध्ये एका कुटुंबातील सदस्य प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
या घटनेमध्ये आत्तापर्यंत 8 जण ठार झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांच्या वारसांना 5 लाखांची आर्थिक मदत देण्याची घोषण मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत. याबाबत अधिकृत पोस्ट मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
एक्स पोस्टमध्ये मुख्यमंत्री लिहितात की, "पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातात काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. या घटनेत प्राण गमावलेल्या व्यक्तींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल."

