Pune Crime News Update : मोठी कारवाई ! डेपोतील 23 सुरक्षारक्षक निलंबित, पुढे काय होणार?

सदर प्रकरणाचा पोलिस अधिक तपासदेखील करत असून अनेक धागेदोरे त्यांच्या हाती लागले आहेत.
Published by :
Team Lokshahi

पुणे येथे सध्या तणावाचे वातावरण आहे. स्वारगेट बसस्थानकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणाचा पोलिस अधिक तपासदेखील करत असून अनेक धागेदोरे त्यांच्या हाती लागले आहेत. अत्याचार प्रकरणातील आरोपीची ओळख पटली असून लवकरच त्याला पोलिस ताब्यात घेतील. दरम्यान या प्रकरणी राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

अनेक राजकीय नेत्यांनी महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर प्रश्नदेखील उपस्थित केले आहेत. याच अनुषंगाने परिवहन मंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. बसस्थानकात हा अत्याचार घडला असून तेथील प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित राहिले. त्यामुळे आता स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षा रक्षकांचे निलंबन करण्यात आले आहे. आता यामध्ये नवीन सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत. त्याचप्रमाणे एसटी आगार व्यवस्थापकावर एसटी महामंडळाकडून कारवाई होणार आहे. ड्युटीवर असलेल्या सुरक्षारक्षकांचीदेखील बदली करण्याचा निर्णय परिवहन मंडळाने घेतला आहे. सदर अत्याचार प्रकरणाचा अहवाल मागवण्यात येणार असून नंतर कारवाई करण्यात येणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com