'विजय शिवतारे महायुतीसोबत' अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल

'विजय शिवतारे महायुतीसोबत' अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल

बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढविणार अशी घोषणा केली होती.
Published by :
Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यावर विजय शिवतारे ठाम आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढविणार अशी घोषणा केली होती. विजय शिवतारे यांची 'वर्षा' या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विशेष बैठक पार पडली.

याच पार्श्वभूमीवर आता विजय शिवतारे महायुतीसोबत अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. या पोस्टवर विजय बाप्पू शिवतारे महायुती सोबतच 'अबकी बार सुनेत्रा वहिनी खासदार' असे लिहिण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल केल्या जात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com