पुण्यातील येरवडा जेलमध्ये राडा; कैंद्यामध्ये तुफान हाणामारी

पुण्यातील येरवडा जेलमध्ये राडा; कैंद्यामध्ये तुफान हाणामारी

पुण्यातील प्रसिद्ध येरवडा कारागरात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक झाली आहे.

चंद्रशेखर भांगे, पुणे

पुण्यातील प्रसिद्ध येरवडा कारागरात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक झाली आहे. जुने कैदी आणि नवीन कैद्यी यांच्यामध्ये हाणामारी झाली आहे. दगडफेक सुरू असताना दगडफेक अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारागृह पोलीस हवालदारांला कैद्याच्या जमावाने मारहाण केली आहे.

येरवडा कारागृहातील हॉस्पिटल सेप्रेट ७ जवळ असलेल्या बरेक नंबर २७ ते ३१ या बॅरिक जवळ ही तुफान दगडफेक झाली आहे. येरवडा कारागृहातील सुरक्षा व्यवस्था धोक्यात असल्याचे आता यावरुन समजते.

कारागृहात दगडफेक करत राडा घातल्या प्रकरणी न्यायालयीन बंदी समीर शकील शेख, बंदी निलेश श्रीकांत गायकवाड, बंदी पुरुषोत्तम राजेंद्र वीर आणि बंदी देवा साहेब जाधव कारागृहातील कैद्यांवर येरवडा पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com