महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पावसाळा सुरु झाला की निसर्ग जणू हिरव्या गालिच्यात लपेटतो. धुके, धबधबे आणि थंड हवामान यामुळे किल्ल्यांवर ट्रेकिंग करणे अधिक साहसी आणि आनंद देणारे वाटते.छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले म्हणजे स्वराज्याच्या प्रेरणास्थानांची ओळख आहेत. पावसाळा हा महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी खरी सौंदर्य-ऋतु आहे. इतिहास, साहस आणि निसर्ग यांचं अनोखं मिश्रण अनुभवायचं असेल तर दुर्गप्रेमींना पुणे आणि मुंबई परिसरातील हे किल्ले पावसाळ्यात नक्कीच पाहण्यासारखे आहेत.
पुण्याजवळील किल्ले
सिंहगड किल्ला
पुण्यापासून अंतर: सुमारे 30किमी
वैशिष्ट्ये: पुणेकरांचा आवडता किल्ला , लहान व सोपा ट्रेक, गडावरती मिळणारे गरम भजी आणि ताक व पिठले भाकरी.
पावसाळ्यातील सौंदर्य: हिरवळ, धुकं आणि थंड वाऱ्यामुळे वातावरण अत्यंत प्रसन्न.
राजगड किल्ला
पुण्यापासून अंतर: सुमारे 60 किमी
वैशिष्ट्ये: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा मुख्य किल्ला, विस्तीर्ण तटबंदी, गुहा आणि देखणं पठार.
पावसाळ्यातील सौंदर्य: धबधबे, धुकं आणि डोंगर उतारांवरील हिरवळ अनुभवायला मिळते.
तोरणा किल्ला
पुण्यापासून अंतर: सुमारे 65 किमी
वैशिष्ट्ये: पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला सर्वात पहिला किल्ला.
पावसाळ्यातील सौंदर्य: दाट झाडी, वाऱ्याचा गारवा आणि ढगांच्या सावलीत दिसणारा ट्रेक.
ट्रेक मार्ग: वेल्हे गावाहून सुरुवात केली जाते.
लोणावळा (लोणवळा) – लोहगड किल्ला
पुण्यापासून अंतर: सुमारे 60 किमी
वैशिष्ट्ये: 'विंचूकाटा' म्हणून प्रसिद्ध असलेली तटबंदी, सोपा ट्रेक, कुटुंबासह जाता येण्यासारखा.
पावसाळ्यातील सौंदर्य: पाण्याचे झरे, धुके, हिरवेगार दर्या व धबधबे.
विसापूर किल्ला
पुण्यापासून अंतर: सुमारे 65 किमी
वैशिष्ट्ये: लोहगडपेक्षा मोठा किल्ला, गडावरील पाण्याचे तलाव आणि तटबंदी.
पावसाळ्यातील सौंदर्य: धबधबे, झरे आणि धुक्याने झाकलेला मार्ग.
टिकोना किल्ला
पुण्यापासून अंतर: सुमारे 60 किमी
वैशिष्ट्ये: त्रिकोणी (पिरॅमिडसारखा) आकाराचा किल्ला, पवना धरणाचे विहंगम दृश्य.
पावसाळ्यातील सौंदर्य: छोटा पण थोडासा चढउतार असलेला ट्रेक, हिरवे डोंगर आणि शांत परिसर.
मुंबईजवळील किल्ले
कर्नाळा किल्ला
मुंबईपासून अंतर: सुमारे 50 किमी
वैशिष्ट्ये: कर्नाळा पक्षी अभयारण्यात स्थित, निसर्ग निरीक्षणासाठी योग्य.
पावसाळ्यातील सौंदर्य: दाट जंगलातला ट्रेक, ढगांनी वेढलेला किल्ला.
राजमाची किल्ला
मुंबईपासून अंतर: सुमारे 95 किमी (लोणावळा मार्गे)
वैशिष्ट्ये: श्रीवर्धन आणि मनरंजन असे दोन किल्ले, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य.
पावसाळ्यातील सौंदर्य: जंगलातून जाणारा ट्रेक, अनेक लहान धबधबे आणि फायरफ्लाई (जूनमध्ये).
प्रबळगड किल्ला
मुंबईपासून अंतर: सुमारे 60 किमी
वैशिष्ट्ये: जंगलातून जाणारा ट्रेक, कलावंतीण दुर्गाजवळ.
पावसाळ्यातील सौंदर्य: धुके, पाण्याचे झरे आणि हिरवी झाडी.
कलावंतीण दुर्ग
मुंबईपासून अंतर: सुमारे 55 किमी
वैशिष्ट्ये: खडकात कोरलेली पायऱ्या, अतिशय थरारक ट्रेक.
पावसाळ्यातील टिप: जोरदार पावसात धोका संभवतो, मार्ग कठीण आहे – अनुभवी ट्रेकरनेच करावा.
महुली किल्ला
मुंबईपासून अंतर: सुमारे 80 किमी (आसनगाव जवळ)
वैशिष्ट्ये: ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण, निसर्गसंपन्न ट्रेक मार्ग.
पावसाळ्यातील सौंदर्य: दाट जंगल, पाण्याचे झरे आणि पक्ष्यांचे आवाज.