Punjab
Punjab

Punjab : पंजाबमध्ये फटाका कारखान्यात स्फोट, 5 कामगारांचा मृत्यू, 27जण जखमी

पंजाबमध्ये फटाका कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Punjab) पंजाबमध्ये फटाका कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 5 कामगारांचा मृत्यू झाला असून 27जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पंजाबमधील मुक्तसर साहिब येथे एका फटाक्यांच्या फॅक्टरीत रात्री उशिरा हा भीषण स्फोट झाला.

जखमींना बठिंडा येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून स्फोटामुळे फॅक्टरीच्या दोन मजल्यांचे पूर्णपणे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि मदत पथके घटनास्थळी पोहोचली

कारखान्यात अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला काही समजण्यापूर्वीच मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मदतकार्य सुरू आहे. स्फोटाची नेमकी कारणं अद्याप समजू शकलेली नाहीत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com