ताज्या बातम्या
BMC Cleaning Staff : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न Lokशाही मराठीवर; गाड्यांचे रोज ऑडिट,मात्र मुकादमाचं दुर्लक्ष
लोकशाहीच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आला आहे. कचरा वेचण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांमुळे सफाई कर्मचाऱ्यांना इजा होत आहे.
(BMC Cleaning Staff) लोकशाहीच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आला आहे. कचरा वेचण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्यांमुळे सफाई कर्मचाऱ्यांना इजा होत आहे. अनेक गाड्याना दरवाजे, खिडक्या आणि काचा नाहीत तसेच सिग्नल लाइट्सही बंद आहेत.
या गाड्यांचे रोज ऑडिट होते मात्र मुकादमाचे दुर्लक्ष आणि कंत्राटदार पालिका अधिकाऱ्यापासून ते मुकादमापर्यंत सगळ्याना मॅनेज करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांना नाहक त्रासाला समोर जाव लागत आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या कानावर हा विषय जात नाही या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही.
तोपर्यंत सफाई कर्मचाऱ्यांचा आवाज लोकशाहीच्या माध्यमातून उठवण्यात येणार, या जुन्या आणि भंगारात काढायच्या अवस्थेत असणाऱ्या गाड्यावर आरटीओकडून का कारवाई केली जात नाही असा सवाल लोकशाहीने केला आहे.
