Rahul Gandhi
Rahul Gandhi

मोठी बातमी! राहुल गांधींची लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती; वायनाडमधून दिला राजीनामा

राहलु गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून राजीनामा दिला असून लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलीय. काँग्रेस कार्यकारिणी सदस्यांनी याबाबतचा ठराव मंजूर केला आहे.
Published by :

Rahul Gandhi Resigns From Wayanad : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली मतदारसंघातून विजयी झाले. गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून राजीनामा दिला असून लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलीय. काँग्रेस कार्यकारिणी सदस्यांनी याबाबतचा ठराव मंजूर केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अशोक हॉटेलमध्ये पहिल्यांदाच काँग्रेस शिष्टमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, खासदार राहुल गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते.

काँग्रेसच्या या बैठकीत सर्व नवनिर्वाचित खासदार सहभागी झाले होते. राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी पार पाडावी, अशी इच्छा बहुतांश खासदारांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, राहुल गांधींनी वायनाडमधून राजीनामा दिला आहे. सोनिया गांधींच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे राहुल गांधी रायबरेलीतून खासदार राहणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com