Rahul Gandhi PC : मतांची फसवणूक नेमकी कशी झाली?
Rahul Gandhi PC : मतांची फसवणूक नेमकी कशी झाली? राहुल गांधींनी थेट पुरावे सादर; नाव एका व्यक्तीचं, मत दुसऱ्याचं आणि...Rahul Gandhi PC : मतांची फसवणूक नेमकी कशी झाली? राहुल गांधींनी थेट पुरावे सादर; नाव एका व्यक्तीचं, मत दुसऱ्याचं आणि...

Rahul Gandhi PC : मतांची फसवणूक नेमकी कशी झाली? राहुल गांधींनी थेट पुरावे सादर; नाव एका व्यक्तीचं, मत दुसऱ्याचं आणि...

राहुल गांधी आरोप: मतदार यादीतील घोटाळ्याचे पुरावे सादर, मतांची फसवणूक कशी झाली याचा खुलासा.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Rahul Gandhi PC on ECI : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत मतदान प्रक्रियेतील घोटाळ्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी काही मतदारांची नावं समोर आणली असून त्या मतदारांची नावे एका विशिष्ट मतदारसंघातील आहेत. या नावांना वगळण्यासाठी, त्यांच्या नावे चुकीच्या पद्धतीने अर्ज भरले गेले होते. अधिक आश्चर्यकारक बाब म्हणजे, ज्या व्यक्तींच्या मोबाईल क्रमांकांचा वापर करण्यात आला, त्या व्यक्तींना याबद्दल काही माहिती नव्हती. राहुल गांधींनी त्या व्यक्तींनाही पत्रकार परिषदेत बोलावले आणि त्यांचा अनुभव सांगितला.

राहुल गांधींचा दावा काय आहे?

राहुल गांधींनी स्पष्टपणे सांगितले की, "मी विरोधी पक्षनेता आहे, आणि मी हे मुद्देसुद सांगत आहे कारण मी पूर्णपणे सत्यावर आधारित पुरावा हातात घेतले आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त त्या लोकांना वाचवत आहेत जे भारतीय लोकशाहीला धक्का पोहोचवतात." त्यांना हा दावा करतांना असेही सांगितले की, "मतं वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काही लोक नियोजनपूर्वक कृत्य करत आहेत. यामध्ये दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्यांक समुदायाचे लक्ष करण्यात आले आहे. याचा १०० टक्के पुरावा आम्ही सापडला आहे."

"आता मी कोणतेही विधान १००% पुराव्याशिवाय करणार नाही. माझं देशाच्या लोकशाहीवर अपार प्रेम आहे. हे पुरावे मांडताना, मी फक्त तुमच्यापुढे सत्य ठेवत आहे. निर्णय आता तुमचा आहे," असा राहुल गांधींनी आवाहन केले.

कर्नाटकमधील आलंद मतदारसंघातील धक्कादायक घटना

राहुल गांधींनी कर्नाटकमधील आलंद मतदारसंघात घडलेल्या एका गंभीर घोटाळ्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले, "आलंद हा कर्नाटकमधील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. इथे काही लोक ६०१८ मतदारांची नावं मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न करत होते. २०२३ मध्ये किती मतं रद्द झाली याची माहिती अद्याप आपल्याला मिळालेली नाही. परंतु, या प्रक्रियेत एका मतदान केंद्रावर एक अधिकारी रंगेहाथ पकडला गेला. त्याला त्याच्या काकाचं नाव वगळले गेले असल्याचं आढळलं. त्यानंतर तपास केल्यानंतर हे समजले की, शेजाऱ्याने त्याचं नाव वगळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो व्यक्ती मात्र म्हणाला की, त्याने असे काहीही केले नाही."

"आलंद मतदारसंघात ६०१८ मतदारांची नावे वगळण्यासाठी अर्ज सादर केले गेले. या अर्जांचा भरणा त्या व्यक्तींनी कधीच केला नव्हता. हे अर्ज सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ऑटोमॅटिकली भरले गेले होते, आणि त्यासाठी वापरले गेलेले मोबाईल क्रमांक कर्नाटकमधून बाहेरच्या विविध राज्यांतील होते. या प्रकारे मतदारांची नावे वगळली गेली आणि काँग्रेस पक्षाचे मतं कमी करण्यासाठी हे सर्व केले गेले. विशेषतः ज्या मतदान केंद्रांवर काँग्रेस पक्ष जिंकण्याच्या स्थितीत होता, त्या ठिकाणी हे घोटाळे करण्यात आले," असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com