Rahul Gandhi
Rahul Gandhi

लोकसभेच्या एक्झिट पोलवर राहुल गांधींची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले; "सिद्धू मुसेवालाचं गाणं..."

एनडीएला ३०० हून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज विविध एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. अशातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या एक्झिट पोलवर नाराजी व्यक्त करत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :

Rahul Gandhi On Loksabha Exit Poll : लोकसभा निवडणूक २०२४ चे मतदानाचे सर्व सात टप्पे पार पडले असून येत्या ४ जूनला निकाल लागणार आहे. तत्पूर्वी, विविध संस्थांनी आणि राजकीय विश्लेषकांनी या लोकसभा निवडणुकीसाठी एक्झिट पोल जाहीर केले आहेत. एनडीएला ३०० हून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज विविध एक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. अशातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या एक्झिट पोलवर नाराजी व्यक्त करत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना काय म्हणाले राहुल गांधी?

"याचं नाव एक्झिट पोल नाही. मोदी मीडिया एक्झिट पोल असं याचं नाव आहे. हा मोदींची पोल आहे. त्यांचा काल्पनिक पोल आहे". इंडिया आघाडील किती जागा मिळणार? या प्रश्नाचं उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, सिद्धू मुसेवालाचं (दिवंगत पंजाबी गायक) गाणं ऐकलंय का तुम्ही...२९५, असं म्हणत त्यांनी इंडिया आघाडीला २९५ जागा मिळणार असल्याचा दावा केला.

लोकशाहीच्या एक्झिट पोलनुसार, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असलेल्या एनडीएला ३८० जागा मिळणार असून इंडिया आघाडीला १२३ जागा मिळणार आहेत. इतर पक्षांना ४० जागा मिळतील. यामध्ये भाजपला ३२४, काँग्रेसला ६४, टीएमसीला १३, आम आदमी पक्षाला २ तर इतरसाठी ४० जागा मिळतील. तर महाराष्ट्रात महायुतीला २१, मविआला २६ आणि इतरसाठी १ जागा मिळेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com