Odisha Train Accident  : रेल्वे अपघातावर राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसच्या काळातही रेल्वे अपघात झाला होता पण…

Odisha Train Accident : रेल्वे अपघातावर राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसच्या काळातही रेल्वे अपघात झाला होता पण…

ओडिशाच्या बालासोरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे
Published by  :
Siddhi Naringrekar

ओडिशा : Odisha Train Accident: ओडिशाच्या बालासोरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये आतापर्यंत २८८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघाताबाबत रेल्वे बोर्डाने पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनेचा खुलासा केला आहे.

 राहुल गांधी सध्या अमेरिकेत आहेत.  यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले की, भाजपला विचारलं की हा ओडिसातील रेल्वे अपघात कसा झाला तर ते म्हणतील, की काँग्रेसने मागच्या 50 वर्षात काय केलं? काँग्रेसच्या काळातही असाच रेल्वे अपघात झाला होता. तेव्हा काँग्रेस नेत्यांनी असं नाही म्हटलं की हा अपघात इंग्रजांमुळे झाला…. उलट त्यांनी म्हटलं की मी या अपघाताची मी जबाबदारी घेतो अन् राजीनामा देतो. पण आता तसं घडताना दिसत नाही. असे राहुल गांधी म्हणाले.

Odisha Train Accident  : रेल्वे अपघातावर राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसच्या काळातही रेल्वे अपघात झाला होता पण…
Odisha Train Accident: ओडिशा दुर्घटनेनंतर 51 तासांनंतर पहिली ट्रेन रवाना

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com