म्हणून माझी खासदारकी रद्द केली गेली - राहुल गांधी
Admin

म्हणून माझी खासदारकी रद्द केली गेली - राहुल गांधी

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी पत्रकार परिषद घेत अदाणींच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी पत्रकार परिषद घेत अदाणींच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे. दिल्ली झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राहुल गांधी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, संसदेत मी अदानी - मोदी यांचे नाते काय, 20 हजार कोटी कुणाचे? एवढाच प्रश्न विचारला.

राहुल गांधी म्हणाले की, अदानीची शेल कंपनी आहे. त्यात 20 हजार कोटी कोणी गुंतवले? ते अदानीचे पैसे नाहीत. मी एवढाच प्रश्न विचारला होता. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनल्यापासून त्यांचे नाते आहेमी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून सांगितलं आहे. पण भाजपचे मंत्री सभागृहातही खोटं बोलत असतात.

तसेच मी अदानी आणि मोदी यांच्या संबंधावर भाष्य केलं. म्हणून माझी खासदारकी रद्द केली गेली. माझी खासदारकी रद्द करून मी गप्प बसेन असं तुम्हाला वाटत असेल. पण मी गप्प बसणार नाही.मी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारत राहणार. मला धमकावून तोंड बंद करु शकत नाही. असे राहुल गांधी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com