Rahul Gandhi : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत राहुल गांधींचा मोठा खुलासा; म्हणाले...

राहुल गांधी यांनी आज दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर आणि मतदान प्रक्रियेवर केलेले घोटाळ्याचे सर्व पुरावेच बाहेर काढले आहेत.
Published by :
Prachi Nate

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रासह इतर राज्यांतील मतदान प्रक्रियेवर आणि निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर आता राहुल गांधी यांनी आज दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर आणि मतदान प्रक्रियेवर केलेल्या घोटाळ्याच्या आरोपांचे सर्व पुरावेच बाहेर काढले आहेत. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाची भाजपसोबत हात मिळवणी केली असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.

तसेच "लोकसभा आणि विधानसभेदरम्यान 1 कोटी मतदार वाढले. याबद्दल निवडणूक आयोगाने डिजीटल डेटा का दिला नाही?" असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केली. पुढे ते म्हणाले की,"महाराष्ट्रात 5 महिन्यात 5 वर्षांपेक्षा जास्त मतदार कसे? महाराष्ट्रात संध्याकाळी 5 नंतर जास्त मतदान कसे? भाजपा आणि निवडणूक आयोगाने मतं चोरली" असा आरोप देखील राहुल गांधींनी केला आहे.

त्याचसोबत मतदार यादी खरी की खोटी? प्रस्थापित विरोधी लाटेचा भाजपला धक्का कसा बसत नाही?, आणि बनावट लोकांचा मतदार यादीत समावेश असल्याचा आरोप राहुल गांधींनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत घेत केला. यावेळी राहुल गांधींनी आकडेवारी, फोटो आणि यादी सादर केल्यामुळे महाराष्ट्रासह राज्यभरात या पत्रकार परिषदेतून स्फोटक माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com