Rahul Gandhi | Aurangabad
Rahul Gandhi | AurangabadTeam Lokshahi

'भारत जोडो' सुरू करण्याचं खरं कारण राहुल गांधी म्हणाले...

सध्या 'भारत जोडो' यात्रा हिमाचल प्रदेशात दाखल झालीये.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सध्या 'भारत जोडो' यात्रा हिमाचल प्रदेशात दाखल झालीये.खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेत दाखल झाले आहेत.हुल यांच्या भारत जोडो यात्रेची मोठी चर्चा झाली आहे. लवकरच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे. दरम्यान भारत जोडो यात्रेचा समारोप ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये होणार आहे.

मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही यात्रा सुरू करण्याचे कारण राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. राहुल गांधी म्हणाले की, यात्रेपूर्वी आम्ही संसदेत मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला. पण ते आम्हाला तिथे मुद्दे मांडू दिले नाहीत. भारतातील संस्था, मग ती न्यायव्यवस्था असो वा प्रेस, ते सर्व भाजप-आरएसएसच्या दबावाखाली आहेत. त्यामुळे आम्ही कन्याकुमारी येथून यात्रेला सुरुवात केली.

तसेच ते म्हणाले की, ही मोहिम २६ मार्चपर्यंत चालणार आहे. या नव्या योजनेअंतर्गत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी द्वेष, बेरोजगारी, महागाई आणि सर्वसामान्य जनतेशी संबंधित इतर प्रश्नांबाबत पत्र लिहिले आहे. हे पत्र बुथ पातळीपर्यंत पोहचवून नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे. असे त्यांनी सांगतिले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com