राहुल गांधी 'या' दिवशी सांगलीत येणार; विश्वजीत कदम म्हणाले...
राहुल गांधी 5 सप्टेंबरला सांगलीत येणार आहेत. सांगलीत पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं 5 सप्टेंबरला लोकार्पण आहे. राहुल गांधी यांच्या हस्ते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा असणार आहे.
याच पार्श्वभूमीवर विश्वजीत कदम म्हणाले की, 5 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे नेते आणि देशाच्या लोकसभेचं विरोध पक्षनेते आदरणीय राहुलजी गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या शुभहस्ते व अध्यक्षतेखाली डॉ. पतंगरावजी कदम यांच्या पुतळ्याचं व कडेगाव येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना परिसरातल्या त्यांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळा तिथे होणार आहे.
5 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता कार्यक्रम असणार आहे. असे विश्वजीत कदम म्हणाले

.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)