Rahul Narvekar | "येणाऱ्या 5 वर्षांत सरकारने जनतेच्या सेवेसाठी ध्येय ठेवली अहेत": राहुल नार्वेकर
लोकशाही मराठी न्यूज चॅनेल आयोजित 'ग्लोबल महाराष्ट्र' महाराष्ट्राच्या भविष्याचा वेध घेण्यासाठी आज भव्य संमेलन पार पडत आहे. या कार्यक्रमाला दुपारी 2 वाजल्यापासून सुरुवात झाली असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याचपार्श्वभूमिवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकशाही मराठीच्या ग्लोबल महाराष्ट्र कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला आहे.
"समृद्धी महामार्गामुळे ज्यांच्या जमिनी जात असतील तर..", काय म्हणाले राहुल नार्वेकर
लोकशाही मराठी न्यूज चॅनेल आयोजित 'ग्लोबल महाराष्ट्र' या कार्यक्रमात मुलाखत देत असताना राहुल नार्वेकर म्हणाले की, "आपलं सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांना आपण मदत करत आहोत, सोशल सेक्टरमध्ये आपण बदल घडवत आहोत. लाडकी बहिण योजनेअंतर्गत अनेक महिलांना स्वावलंबी केल आहे. या सगळ्या योजना आणून आपण मूलभूत सुधार सामान्य लोकांच्या आयुष्यात सुधार घडवण्यासाठी कार्याबद्दल आहोत. प्रत्येक माणसाला डोक्यावर छप्पर आणि खायला भरपूर अन्न आणि रोजगाराची हमी आपण येणाऱ्या पाच वर्षात देऊ आणि त्यावर आपण काम देखील करू, असा मला विश्वास आहे. ग्रामीण भागातील विकासावर बोलताना नार्वेकर म्हणाले की, आपण समृद्धी महामार्ग बघितला तर तो दोन शहरांना जोडतो आहे आणि किती गावांना तो रस्ता जात आहे. विकास हवा असेल तर त्यागाची भूमिका घ्यावीच लागेल. ज्यांच्या जमिनी जात असतील तर, त्यांना आपण भरपाई देतो आहोत".
"तुमच्यावर झालेल्या टीकांना कसे सामोरे गेलात?" - नार्वेकरांनी काय उत्तर दिले?
नार्वेकरांवर होणाऱ्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, मी कोणत्याही टीका टिपणीकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे मी योग्य तो निर्णय घेऊ शकलो. माझ्यावर केल्या जाणाऱ्या टीका या माझं लक्ष विचलित करून कोणता तरी दबाव माझ्या निर्णय प्रक्रियेवर आणण्यासाठी केल्या जात असतील असं मला वाटत. त्यामुळे माझा असा सल्ला आहे की, तुम्ही जेव्हा कोणतीही भूमिका बजावत असता आणि तेव्हा इतरांचे लक्ष असतं त्यावेळेला तुमच्यावर होणाऱ्या टीका टिपणीकडे लक्ष दुर्लक्ष करा, आणि मी तेच केलं. मी घेतलेला निर्णय किती योग्य आहे त्यावर कोर्ट निर्णय घेईल. त्या निर्णयात कोणत्याही प्रकारचा बदल होईल असं मला वाटत नाही, त्या निर्णयामुळे एक संसदीय भक्कमता आपण वाढवत आहोत, असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.