Raigad Crime : सोशलमीडियाची ओळख पडली महागात!
Raigad Crime : सोशलमीडियाची ओळख पडली महागात! अल्पवयीन मुलीसोबत ठेवले शारीरिक संबंध, नंतर मात्र... Raigad Crime : सोशलमीडियाची ओळख पडली महागात! अल्पवयीन मुलीसोबत ठेवले शारीरिक संबंध, नंतर मात्र...

Raigad Crime : सोशलमीडियाची ओळख पडली महागात! अल्पवयीन मुलीसोबत ठेवले शारीरिक संबंध, नंतर मात्र...

रायगड गुन्हा: सोशल मीडियावर ओळख महागात, अल्पवयीन मुलीसोबत संबंध, गर्भवती झाल्यावर लग्नास नकार.
Published by :
Riddhi Vanne
Published on

थोडक्यात

रायगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे

सोशलमीडियाची ओळख पडली महागात

इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या एका 16 वर्षीय मुलाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले

रायगडच्या उरणमध्ये सोशल मीडियावर सुरू झालेली ओळख एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसाठी गंभीर ठरली आहे. इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या एका 16 वर्षीय मुलाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, मुलगी गर्भवती राहिल्यावर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.

उरण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा दोघांनीही आपले शिक्षण अर्धवट सोडले आहे. जानेवारी 2024 मध्ये त्यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली आणि त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. मुलीच्या पालकांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी मुलाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी मुलाने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, आणि मुलीच्या पालकांनीही तिचे वय पूर्ण झाल्यावर लग्न लावून देण्याची तयारी दाखवली. तोपर्यंत मुलीला मुलाच्या घरी ठेवण्यात आले. मात्र, मुलगी गर्भवती राहिल्यानंतर मुलाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्न करण्यास नकार दिला आणि तिला घरातून बाहेर काढले.

पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलावर बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियाच्या वापराबाबत आणि अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com