Maharashtra Weather : राज्यात पाऊस अन् थंडीची लाट, अलर्ट जारी
थोडक्यात
राज्यात पुन्हा पावसाची एन्ट्री होणार
राज्यात झपाट्याने वातावरण बदल
पुढील दोन दिवस अनेक भागात पावसाची देखील शक्यता
राज्यात मागील काही दिवसांपासून राज्यात थंडी जाणवू लागली असताना आता पुन्हा एकदा पावसाने डोक वर काढणार आहे . राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून वातावरण सतत बदलताना दिसत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस बघायला मिळाला तर आता अनेक ठिकाणी गारठा वाढला आहे. बऱ्याच भागात पाऊस देखील सुरू आहे. वातावरणातील बदलामुळे लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. ऐन नोव्हेंबरमध्ये काही भागात प्रचंड कडाक्याची थंडी पडली आहे तर अजूनही काही भागात पाऊस सुरू आहे. उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी चंदीगड, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. यासोबतच महाराष्ट्रात देखील थंडी वाढले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात झपाट्याने वातावरण बदल असून याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले तर आता राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. यातच भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यात थंडीची लाट असणार असणार असल्याची माहिती दिली आहे.
तर दुसरीकडे राज्यात थंडीची (IMD Alert) लाट असताना पुढील दोन दिवस अनेक भागात पावसाची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात 1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम असल्याने राज्यात पुढील काही दिवसांमध्ये थंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव, निफाड, नाशिक, परभणी आणि अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) थंडी अधिक वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे चंदीगड, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगडमध्ये देखील थंडीची लाट असणार असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी राज्यातील काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता असून किमान तापमानाच्या पाऱ्यात 4 ते 5 अंशांची घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुढील काही दिवस थंडी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
