India Rain Alert : ऐन दिवाळीत ‘या’ राज्यांना पाऊस झोडपणार

India Rain Alert : ऐन दिवाळीत ‘या’ राज्यांना पाऊस झोडपणार

गेले काही दिवस देशभरात वातावरणात अनेक प्रकारचे बदल दिसून येत आहेत. (India Rain Alert) मध्येच मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी कडकडीत उन्हाळा तर काही ठिकाणी थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • राज्यात आज अनेक राज्यांत पावसाची शक्यता

  • पर्वतीय राज्यांमध्ये थंडी पडण्यास सुरुवात

  • ऐन दिवाळीत पावसाचा अंदाज

गेले काही दिवस देशभरात वातावरणात अनेक प्रकारचे बदल दिसून येत आहेत. मध्येच मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर काही ठिकाणी कडकडीत उन्हाळा तर काही ठिकाणी थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. कालपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. मात्र ऐन दिवाळीत देखील काही राज्यांमध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता आहे. आज कोणता इशारा हवामान विभागाने दिला आहे ते जाणून घेऊयात.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज अनेक राज्यात पावसाचा अंदाज आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये इतक्यात पावसापासून सुटका होण्याची शक्यता नाहीये. किनारपट्टीवरील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. केरळ, तामिळनाडू, पोंडीचेरी राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात वादळी वाऱ्यांसाह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. काही भागात वादळ देखील याण्याची शक्यता आहे.

मध्यप्रदेशमध्ये देखील बदलते हवामान पाहायला मिळून येत आहे. मात्र पाऊस अजूनही थांबलेला नाही. ऐन दिवाळीत पाऊस हजेरी लावत असल्याने नागरिकांचा हिरमोड झाला आहे. तर दुसरीकडे राजधानी दिल्ली आणि उत्तर भारतात हवामानात बदल झाला आहे.

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये दिवसभर ऊन आणि रात्री कडाक्याची थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये देखील ऊन पाऊस आणि थंडीचा खेळ सुरूच आहे. बिहार आणि झारखंडमध्ये देखील पासचा शक्यता नाहीये. मात्र तेथील हवामानात बदल पाहायला मिळू शकतो.

उत्तराखंडमध्ये थंडी पडण्यास सुरूवात

सध्या पर्वतीय राज्यांमध्ये हवामान मोकळे आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेस हवामान बदलत आहे. उत्तराखंडमध्ये अनेक भागात बर्फवृष्टी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत उत्तराखंडमध्ये थंडी पडण्याची शक्यता आहे. थंडी पडण्यास सुरूवात तर हिमाचल प्रदेशमध्ये व जम्मू काश्मीर देखील झाली आहे.

कोकण किनारपट्टी, गोवा राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलामुळे राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासाह पावसाची शक्यता आहे. पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्य सरकार आणि प्रशासनाने नागरिकांना काळजीचे आणि सतर्कतेचे आवाहन केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com