ताज्या बातम्या
Raj Thackeray - Uddhav Thackeray Reunion : नव्या युतीची नांदी!; 'आम्ही वाट बघतोय...', राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्रित पत्र
राज्यातील हिंदी सक्तीविरोधातील मोहिमेला यश आल्यानंतर अखेर मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकत्र जल्लोष करण्याचे योजले आहे.
राज्यातील हिंदी सक्तीविरोधातील मोहिमेला यश आल्यानंतर अखेर मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकत्र जल्लोष करण्याचे योजले आहे. या निमित्ताने दोघांनीही प्रथमच एकत्रित पत्रक काढून राज्यातील जनतेला जल्लोषात सामील होण्याचे आवाहन केले आहे. हा विजय आमचा नसून तुमचा आहे. त्यामुळे वाजत गाजत या, गुलाल उधळत या. आम्ही वाट बघतोय.., अशा आशयाचे पत्र त्यांनी जनतेला लिहिले आहे. हे पत्र संजय राऊ यांनी त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट केले आहे. त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित नावाचे हे पहिले पत्र आल्यानंतर आता हे दोघे एकत्र कधी येणार, असा सवाल राज्यातील जनता विचारत आहे.