परळी कोर्टाकडून राज ठाकरेंचं अटक वॉरंट रद्द

परळी कोर्टाकडून राज ठाकरेंचं अटक वॉरंट रद्द

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते.  हे वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे आज सकाळी ११ वाजता परळी कोर्टात दाखल झाले. आता परळी कोर्टाकडून राज ठाकरे यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे. 500 रुपयांचा दंड ठोठावत बीडच्या परळी न्यायालयाकडून राज ठाकरेंचा वॉरंट रद्द करण्यात आला आहे. या प्रकरणावर आता येत्या 23 जानेवारी रोजी सुनावणी होणार असल्याचं राज ठाकरे यांच्या वकिलाने सांगितलं. राज ठाकरे यांचं अटक वॉरंट रद्द झाल्यानंतर राज ठाकरे कोर्टाबाहेर आले. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

2008 मध्ये परळीत मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली होती. मराठी पाट्या आणि मराठी मुद्द्यावर आंदोलन केल्यानंतर बळजबरी दुकानं बंद करणं, दुकानं बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडणं याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी परळी न्यायालयाने राज ठाकरेंना दोन वेळा अटक वॉरंटही जारी केलं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com