ताज्या बातम्या
Raj Thackeray : राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, निवडणुकीसाठी मनसेची खलबतं
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर, मनसेची रणनीती ठरवण्यासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या बैठकीत नगराध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांची निवड आणि निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा असून, पक्षाची पुढील दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
