मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज ठाकरेंचं खास शैलीतून  विरोधकांवर टीकास्त्र

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज ठाकरेंचं खास शैलीतून विरोधकांवर टीकास्त्र

मराठवाडा मुक्त झाला पण, तरी या प्रदेशाची प्रगती झालेली नाही. त्यामुळे मराठवाड्यावर ही वेळ आणणाऱ्या 'सजा'कारांना शिक्षा द्या, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी
Published by  :
shweta walge

मराठवाडा मुक्त झाला पण, तरी या प्रदेशाची प्रगती झालेली नाही. त्यामुळे मराठवाड्यावर ही वेळ आणणाऱ्या 'सजा'कारांना शिक्षा द्या, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडत मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले की, आज १७ सप्टेंबर, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा दिवस. मी मागे पण एकदा म्हणालो होतो तसं हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता.

पण हे करताना फक्त 'फोटो-ऑप' म्हणून कार्यक्रम साजरे करणं किंवा मराठवाड्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटणं म्हणजे हा दिवस साजरा केला असं मानून चालणार नाही. पुरेशा पाण्यासाठी मराठवाड्याचा झगडा गेली कित्येक दशकं सुरु आहे, आणि ह्यावेळेला मराठवाडा क्षेत्रांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार आहे.

अशावेळेस एकांनी आश्वासनं द्यायची आणि त्यावर दुसऱ्यांनी टीका करायची आणि टीका करणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना नक्की काय केलं ह्याचा विचार करायचा नाही हे सुरु राहणार असेल तर मराठवाड्यातील जनतेने आता दोघांनाही प्रश्न विचारायची वेळ आली आहे, असं राज म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com