Raj Thackeray in Satyacha Morcha MumbaiRaj Thackeray in Satyacha Morcha Mumbai
ताज्या बातम्या
Raj Thackeray in Satyacha Morcha Mumbai : राज ठाकरेंच्या ऑटोग्राफसाठी 15 मिनिटं उभा; फ्रेम करुन ठेवणार, नेमकं काय घडलं 'या' प्रवासात...
मोर्चाच्या तयारीत, राज ठाकरे आज लोकलने दादर ते चर्चगेट प्रवास करत आहेत, जो अनेक वर्षांनी प्रथमच त्यांनी लोकलने केलेला प्रवास आहे. या प्रवासात त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अविनाश अभ्यंकर उपस्थित होते.
1 नोव्हेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्षांनी 'सत्याचा मोर्चा' आयोजित केला आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
मोर्चाच्या तयारीत, राज ठाकरे आज लोकलने दादर ते चर्चगेट प्रवास करत आहेत, जो अनेक वर्षांनी प्रथमच त्यांनी लोकलने केलेला प्रवास आहे. या प्रवासात त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अविनाश अभ्यंकर उपस्थित होते.
राज ठाकरे दादर स्थानकावर 15मिनिटे लोकलची वाट पाहत उभे होते. यावेळी अनेक प्रवाशांनी त्यांना भेटले आणि ऑटोग्राफ मागितले. राज ठाकरे यांनी एका प्रवाशाला रेल्वे तिकिटावर ऑटोग्राफ दिला, ज्याने तो तिकिट फ्रेम करून ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. राज ठाकरे यांचा हा लोकल प्रवास सध्या चर्चेचा विषय बनला आहे.