Raj Thackeray : राज ठाकरेंची आज तोफ धडाडणार; भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष
Admin

Raj Thackeray : राज ठाकरेंची आज तोफ धडाडणार; भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष

आज संध्याकाळी राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज संध्याकाळी राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरवर्षीप्रमाणं यंदाही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे यांची तोफ शिवतीर्थावर धडाडणार आहे. 17 मार्चला मनसेने गुढीपाडव्या रॅलीचा टीझर प्रदर्शित केला होता. आज 22 मार्च रोजी संध्याकाळी 6 वाजता राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थावर सभा होणार आहे.

राज ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com