Raj Thackeray On Badlapur Case : बदलापूर घटनेवर राज ठाकरेंचे संतापजनक ट्विट, म्हणाले....

Raj Thackeray On Badlapur Case : बदलापूर घटनेवर राज ठाकरेंचे संतापजनक ट्विट, म्हणाले....

बदलापूरमधील एका प्रसिद्ध शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. सफाई कामगाराने अत्याचार केल्याची संतपाजनक घटना समोर आली आहे. याच घटनेवर राज ठाकरे सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

बदलापूरमधील एका प्रसिद्ध शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला आहे. बदलापूरमधील एका शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने हे दृष्कृत्य केलं आहे.. तर लैंगिक अत्याचाराच्या 4 दिवसानंतर प्रशासनाला जाग आल्याचं पाहायला मिळत आहे. ही घटना उजेडात आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. बदलापूरमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेला आदोलकांनी घेराव घातला आहे. तर बदलापूर रेल्वे स्थानकावरही शेकडो आंदोलक जमा झाले असून त्यांनी सर्व रेल्वे रोखून धरल्या आहेत. याच घटनेवर राज ठाकरे सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

राज ठाकरे ट्विट करतं म्हणाले, "बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे, आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या" ....

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com