राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर; स्वागताची जोरदार तयारी

राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर; स्वागताची जोरदार तयारी

तब्बल पाच वर्षानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

तब्बल पाच वर्षानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज दुपारी 4 वाजता राज ठाकरे कोल्हापुरात आल्यानंतर ताराबाई पार्क येथील शासकीय सर्किट हाऊसमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या स्वागताची कोल्हापूरकरांनी जोरदार तयारी केली आहे.

बुधवारी (30 नोव्हेंबर) राज ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करतील. ते अंबाबाई मंदिरात भेट देणार आहेत. आज राज ठाकरेंना पंढरपुरातील माऊली कॉरिडॉरला विरोध करणारे सर्व पक्षीय शिष्टमंडळ कोल्हापुरात विश्रामगृहावर भेटणार आहे.

राज ठाकरे हे 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा दौरा देखील करणार आहेत. दुपारी ते सावंतवाडीच्या दिशेनं रवाना होतील. सायंकाळी पाच वाजता सावंतवाडी इथे ते पोहोचतील. कुडाळ येथे राज ठाकरेंचा मुक्काम असेल. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2022 या कालावधीत सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांचा राज ठाकरे दौरा करतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com