Raj Thackeray : मनसे महायुतीच्या प्रचारात उतरणार; राज ठाकरे म्हणाले...

Raj Thackeray : मनसे महायुतीच्या प्रचारात उतरणार; राज ठाकरे म्हणाले...

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांना आपण पाठिंबा द्यायचा आहे. त्याचे विश्लेषण मी त्यादिवशीच्या सभेमध्ये केलेलं आहे. पहिल्या 5 वर्षातल्या गोष्टी मला पटल्या नाहीत त्याबाबतीत मी जो विरोध करायचा तो विरोधही केला. अनेकवेळा लोक सांगतात की, राज ठाकरेंनी भूमिका बदलली. प्रश्न 2014च्या आधीची भूमिका ही निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर जर तिकडे भूमिका बदलू शकते तर मला असं वाटते की मला भूमिका बदलणं आवश्यक होते. त्याला भूमिका बदलणं म्हणत नाही त्याला धोरणांवरती तुमच्या त्याला टीका म्हणतात. त्याप्रमाणे त्या प्रकारची टीका मी त्यावेळेला केली.

यासोबतच राज ठाकरे पुढे म्हणाले की, अर्थात ती टीका करताना त्याच्या मोबदल्यात काही मागितले नव्हते की मला मुख्यमंत्रीपद पाहिजे म्हणून मी टीका करतोय, माझे 40 आमदार फोडले म्हणून मी टीका करतोय अशा कुठल्या गोष्टींमधून ती टीका नव्हती. तरी ती मुद्यांना टीका होती. त्याच्यानंतरच्या पुढच्या 5 वर्षामध्ये काही गोष्टी ज्या चांगल्या झाल्या. त्याचे स्वागतही मी केलं. जसं 370 कलम रद्द होणे, राम मंदिर सारखा एक विषय इतका मोठा विषय. 1992पासून ते 2024पर्यंत एक रखडलेली गोष्ट ज्याच्यामध्ये आजपर्यंत इतक्या कारसेवकांनी ज्यांनी आपली स्वत:ची आहुती दिली आहे. इतक्या वर्ष प्रलंबित राहिलेला प्रश्न जर नरेंद्र मोदी नसते जरी सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला असला तरी जर ते नसते तर राम मंदिर उभेच राहू शकलं नसते. या गोष्टींवर मी त्यावेळेवा स्वागतही केलं, मी स्वत: फोन करुन अभिनंदन केलं. म्हणून आमच्या पक्षाने असं ठरवले की, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी म्हणून पाठिंबा द्यावा. महाराष्ट्रासाठीच्या आमच्या काही मागण्या आहेत. त्या त्यांच्यापर्यंत जातीलच.

माझी अपेक्षा आहे की, नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य ही त्यांच्या समान अपत्यांसारखी पाळणं आवश्यक आहे. गुजरात त्यांना प्रिय असणं स्वाभाविक आहे कारण ते गुजरात मधलं आहेत. परंतु इतरही राज्यांमध्ये त्यांनी त्याचप्रकारचे लक्ष या पुढच्या 5 वर्षामंध्ये दिलं जाईल. ही माझी अपेक्षा आहे. पुढे कशाप्रकारे त्यांची पाऊलं पडतायत मला वाटते हे ही पाहणं तितकच आवश्यक आणि गरजेचं आहे. परंतु आज मी त्यांना जो पाठिंबा दिलेला आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षातल्या लोकांनी, तीन पक्षातल्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या लोकांनी आमच्या कोणत्या लोकांशी संपर्क साधायचा आहे, कोणाशी बोलायचे आहे आणि पुढे कशाप्रकारे जायचे आहे याप्रकारची यादी एक- दोन दिवसांमध्ये आमच्याकडून तयारी होईल. त्याप्रमाणे ती त्यांच्यापर्यंत जाईल. आमचेही जे पदाधिकारी असतील, महाराष्ट्र सैनिक असतील त्यांनाही ते योग्य मानाने वागवतील अशी माझी अपेक्षा आहे. पूर्णपणे सहकार्य करायचे आणि पूर्णपणे प्रचार करण्यासाठी म्हणून मी सगळ्यांना सांगितले आहे. असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com