Raj thackeray
Raj thackeray Team Lokshahi

राज ठाकरेंची पुण्यात सभा होणार; तारीख अन् वेळंही ठरली

राज ठाकरेंच्या सभेची वेळ चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता.
Published by :
Sudhir Kakde

पुणे|अमोल धर्माधिकारी : राज ठाकरे यांच्या पुण्याच्या सभेवरुन मोठा संभ्रम निर्माण झाला होता. तो संभ्रम आता अखेर संपला असून, पुण्यात 22 मे रोजी रविवारी सकाळी राज ठाकरे सभा घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेचा सन्स्पेस अखेर संपला असून, रविवारी सकाळी दहा वाजता होणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे ही सभा होणार आहे. काल राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द झाल्याची माहिती समोर आली होती. पावसाचं कारण देत ही सभा रद्द करण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती.

Raj thackeray
केतकी चितळे नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात; अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात करणार चौकशी

राज ठाकरे हे 21 मे रोजी पुण्यातील नदीपात्राच्या परिसरात सभा घेणार होते. त्यासाठी तयारी सुद्धा सुरु झाली होती, नदीपात्रातील जागेची पाहणी करुन त्याठिकाणी स्वच्छता करण्याचं काम देखील सुरु करण्यात आलं होतं. राज ठाकरे स्वत: दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असतानाच या तारखेची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता अचानक ही सभा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आता आज नवी माहिती समोर आली आहे.

अयोध्या दौऱ्यापूर्वी होणारी ही सभा अत्यंत महत्वाची मानली जात आहे. याच सभेत ते त्यांना आव्हान देणाऱ्या भाजप खासदार बृजभुषण सिंह यांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर देतील अशी शक्यता आहे. कारण तिकडे बृज भुषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला मोठं आव्हान दिलं आहे. राज ठाकरेंनी मराठी अस्मितेच्या मुद्यावरुन उत्तर भारतीयांना त्रास दिला असून, त्यामुळे त्यांनी माफी मागावी अशी बृज भुषण शरण सिंह यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com