Raj Thackeray : "...तर त्यांना तिथेच फोडून काढायचं", पुरावे दाखवत राज ठाकरेंकडून बोगस मतदार याद्यांचा लेखा जोगा

Raj Thackeray : "...तर त्यांना तिथेच फोडून काढायचं", पुरावे दाखवत राज ठाकरेंकडून बोगस मतदार याद्यांचा लेखा जोगा

मविआ आणि मसनेच्या सत्याचा मोर्चाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही ठाकरे बंधू सहभागी झाले असून राज ठाकरे भाषणात दुबार मतदारांविषयी बोलताना जोरात कडाडले आहेत.
Published by :
Prachi Nate
Published on

आज 1 नोव्हेंबरला मतदारयाद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेचा एल्गार काढणार सत्याचा मोर्चा सुरु झाला असून या मोर्चाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही ठाकरे बंधू सहभागी झाले आहेत. यावेळी दुबार मतदार याद्यांचा लेखा जोगा राज ठाकरेंकडून काढण्यात आला. तसेच राज ठाकरेंकडून दुबार मतदारांचे पुरावे सादर करण्यात आले. यावेळी बोगस आणि दुबार मतदार यादी राज ठाकरेंनी व्यासपीठावर वाचली आहे. जेव्हा कधी निवडणुका होतील तेव्हा घराघरात जा आणि सत्य परिस्थिती पाहा. दुबार मतदार दिसले तर त्यांना तिथेच बडवायचे आणि मग पोलीसांच्या ताब्यात द्यायचे असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे म्हणाले की, "आजचा मोर्चा राग आणि ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत समजून सांगण्याचा हा या मोर्चाचे प्रयत्न आहे. या विषयावर अनेक आणि आधी भाषणे केलेल्या बोललेले आहेत. तोच विषय नव्याने सांगण्यासारखा असा काहीच नाही. मी, उद्धव ठाकरे, शरद पवार या विषयावर बोलत आहेत. एवढेच काय तर भारतीय जनता पक्षाचे आणि शिंदे यांची लोक बोलतात की दो बार मतदान आहेत. मग यांना अडवलय कोणी हे लोक निवडणूक घ्यायची घाई का करत आहेत. साधी गोष्ट आहे मतदार याद्या साफ करा. आज दोन-तीन गोष्टी इथे दाखवण्यासाठी आणले आहे".

"4500 हे मतदार कल्याण ग्रामीण मुरबाड डोंबिवली आणि भिवंडी तले मतदार आहेत. या मतदारांनी मलबार हे या मतदार संघातही मतदान केलं आहे. या सर्व मतदारांनी तिथे त्यांच्या मतदारसंघातही.... प्रभाकर तुकाराम पाटील गजानन पुंडलिक भोईर.... हिच्या मतदारांची उदाहरणार्थ नाव आहे. अशी लाखो लोक आहेत जे मतदार वापरले गेले आहेत. एक जुलैला निवडणूक आयोगाने यादी बंद केली... त्यातली मी यादी वाचून दाखवतो... मुंबई नॉर्थ वेस्ट संपूर्ण मतदारसंघाला 84 हजार 61... प्रभात मतदार 16231... राज ठाकरे यांनी दोबार मतदार केलेल्यांचीदोबार मतदार केलेल्यांची थेट यादीत समोर आणली".

"एवढे पुरावे दिल्यानंतर देखील जानेवारीत निवडणुका घ्यायचा हट्ट सुरू आहे का निवडणुका घ्यायच्या? त्यामुळे अजून एक वर्ष केला तर काय फरक पडेल. एका आमदाराचा भाऊ सांगतो की 20000 मतं आम्ही बाहेरून आणले यांची किंमत बघा. 2017 पासून देवी मशीन मध्ये गडबड आहे. 227 आमदार निवडून आल्यानंतर देखील महाराष्ट्र तर मातंम असेल निवडून आलेल्या लोकाटात चिमटे काढून डोकं बघत होते की निवडून कसे आले? सर्व कारखाना निवडणूक आयोगाला सोबत घेऊन सुरू आहे. मतदारांनी मतदान करायचं पण मॅच अगोदरच फिक्स आहे. मतदान करताना गोबर मतदार जर तिकडे आले तर तिथेच फोडून काढायचं बडोबडो घडवायचे आणि नंतर पोलिसांकडे द्यायचे. त्याशिवाय हे लोक वटणीवर येणार नाहीत".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com