'डॉक्टर आणि नर्सेस यांनी निवडणुकीच्या कामासाठी जाऊ नये' मनसे पाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंचं थेट आवाहन

'डॉक्टर आणि नर्सेस यांनी निवडणुकीच्या कामासाठी जाऊ नये' मनसे पाडवा मेळाव्यातून राज ठाकरेंचं थेट आवाहन

मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडला.

मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'डॉक्टर आणि नर्सेस यांनी निवडणुकीच्या कामासाठी जाऊ नये' असं आवाहन केलं आहे.

ते म्हणाले की, जवळपास पाच वर्षानंतर निवडणुका होत आहे. महानगर पालिकेच्या निवडणुका अजूनही होत नाही आहे. सगळे आचरसंहितावाले जागी झालेत. काल मी एक बातमी वाचली निवडणुकीसाठी महानगर पालिकेतील डॉक्टर आणि नर्सेस यांनी निवडणुकीच्या कामावर जुंपवलय म्हणून. डॉक्टर काय मतदारांचे नाडी मोजणार काय? नर्सेस काय मतदारांचे डायपर बदलणार? ज्याच्यासाठी त्यांची नेमणुकी केली आहे तिथे ते नसावे का? आणि जर निवडणुका होणार आहेत ही गोष्ट निवडणुक आयोगाला प्रत्येत वेळेला माहित असते. तर दरवेळेला डॉक्टर घ्यायचे, शिक्षक घ्यायचे नर्सेस घ्यायचे हे कोणते उपव्याप.

मी आताच सांगतोय डॉक्टर आणि नर्सेस यांनी निवडणुकीच्या कामासाठी जाऊ नये. ज्या रुग्णांची सेवा करण्यासाठी तुम्ही आयुष्य घालवताय त्या हॉस्पिटलमध्ये परत जा काम करा तुम्हाला नोकरीवरुन कोण काढतं मी बघतो. असा थेट आव्हान त्यांनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते, कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं योग्य वेळी सर्व मांडेन. माझी भूमिका मी जाहीर करणारच ना, करावीच लागेल लपवून ठेवणारा नेता मी नाही, असंही राज ठाकरेंनी म्हटलं.

मी अमित शहांना भेटल्यानंतर… 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सतत दाखला दिला जातो. 2014 ची निवडणूक भूमिका मोदी पंतप्रधान होण्याआधी, 2019 ची निवडणूक भूमिका मोदी पंतप्रधान झाल्यानंतर… ह्या भूमिका नीट समजून घ्यायला हव्यात, असंही राज ठाकरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com