Raj Thackeray | मोठी बातमी! पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची मोठी घोषणा

Raj Thackeray | मोठी बातमी! पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची मोठी घोषणा

मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडला.
Published by :
shweta walge

मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीबाबत मोठी घोषणा केली आहे. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय. हा पाठिंबा फक्त नरेंद्र मोदींसाठी असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व मनसैनिकांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.

काय म्हणाले राज ठाकरे?

माझी नरेंद्र मोदींकडे अपेक्षा आहे कि, भारतीय तरुणाईकडे लक्ष द्या. त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा समजून घ्या तसं उमदं वातावरण उभं करा, नव्या कल्पनांना प्रोत्साहन द्या.

जगातला सर्वात तरुण देश आपला भारत देश आहे. पण आपला देश भलत्याच मुद्द्यांमध्ये भरकटला तर मात्र ह्या देशात अराजक येईल. २०२४ ची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. आज जागावाटपाची जी हाणामारी सुरु आहे ती पाहता विधानसभेला कोथळाच काढतील एकमेकांचा. ह्यासाठी निवडणुका असतात का?

मतदारांनो माझं तुम्हाला आवाहन आहे कि, "राजकीय व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. अन्यथा चुकीचा पायंडा पडेल." महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे. माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, उत्तम संघटना बांधणी करा, मतदारसंघ बांधा. तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com